बांगलादेशात तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राहणार उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेजारील देश बांगलादेशमध्ये होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी हिंदुस्थानकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात हिंदुस्थानचे अधिकृत प्रतिनिधित्व करण्यासाठी बिर्ला ढाका येथे जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

बांगलादेशमध्ये अलीकडेच झालेल्या सत्तांतरानंतर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणी हिंदुस्थानची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक सहकार्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये लोकशाही मूल्यांची देवाणघेवाण महत्त्वाची राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेचे प्रतिनिधी म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.