पण कश्मीरचे तर स्वर्ग झालंय ना? ओमर अब्दुल्लांचे भाजप नेत्यावर टीकास्त्र

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेस निवडून आली तर बंगालचे कश्मीर होईल असे वक्तव्य भाजप नेते सुवेंदू यांनी केले होती. पण 2019 नंतर कश्मीर तर स्वर्ग झाले होते ना असा सवाल माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विचारल आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक असून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेस सोडून नुकतेच भाजपवासी झालेले सुवेंदू अधिकारी म्हणाले होते की, तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास पश्चिम बंगालचे रुपांतर जम्मू कश्मीरमध्ये होईल.


जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशन कॉन्फरन्सचे नेते यांनी सुवेंदु यांच्यावर टीका केली आहे. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, भाजपने सांगितल्यानुसार ऑगस्ट २०१९ पासून कश्मीर स्वर्ग झाले आहे. मग पश्चिम बंगालची परिस्थिती कश्मीरसारखी झाली तर काय वाईट आहे? असो, बंगाली जनतेला कश्मीरबद्दल खूप प्रेम आहे, कश्मीरला भेट द्या आणि तुमच्या मुर्ख वक्तव्याबद्दल आम्ही तुम्हाला मोठ्या मनाने माफ करू असेही अब्दुल्ला म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या