
जगभरात ओमायक्रोन धोकादायक पातळीवर पोहचला आहे. ओमायक्रोनचा झपाट्याने प्रसार होत असल्याने गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णावाढीबरोबरच मृत्यूच्या संख्येतही 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक देशांचे टेन्शन वाढले आहे. जगात मागील आठवड्याच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण संख्येत 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण 2.78 दशलक्षावर पोहचली असल्याची माहिती एएफपीने दिली आहे. या वाढीला ओमायक्रोन हा व्हेरिएंट जबाबदार असल्याचेही स्पष्ट केले आहे. आशियात 210 टक्के, मध्य-पूर्वमध्ये 142 टक्के, लॅटीन अमेरिका-पॅरिबियन प्रदेशात 126 टक्के आणि ओशिनियामध्ये 59 टक्के एवढी मोठी रुग्ण वाढ नोंदली आहे.























































