जिनोम सिक्वेन्सिंगशिवाय ओमायक्रोनचे निदान, टाटाच्या ओमीशुअर किटला आयसीएमआरची मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमायक्रोनचा संसर्ग झाला आहे की नाही यासाठी आता जिनोम सिक्वेन्सिंग मशीनवर अवलंबून राहायची गरज नाही. ओमायक्रोन ओळखण्यासाठी टाटा मेडिकल ऍण्ड डायग्नोस्टिक्स ओमीशुअर या टेस्टिंग किटची निर्मिती करणार आहे. आयसीएमआरने 30 डिसेंबरला या किटला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंगशिवाय ओमायक्रोनचे निदान अधिक जलद गतीने होणार आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबरोबर ओमायक्रोनचा प्रसार मोठय़ा वेगाने होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून ओमायक्रोनची लागण झाली आहे की नाही यासाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. मात्र ते खर्चिक असून त्यासाठी वेळही मोठय़ा प्रमाणात लागत आहे. मात्र आता ओमायक्रोनविरोधातील लढय़ामध्ये एक नवे किट आरोग्य यंत्रणांच्या हाती येणार आहे.

  • जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या कमीत कमी वेळेत करणे शक्य होणार आहे.
  • ओमीशुअर एस जीन टार्गेट फेल्युअर स्टेटेजी (एसजीएफटी) वापरून ओमायक्रोनचे निदान करते.
  • सरकार एका आरटी-पीसीआर चाचणीसाठी 20 ते 30 रुपये आकारत आहे, मात्र एसजीएफटीसाठी 240 रुपये मोजावे लागणार आहेत.
  • सध्या हेच किट अमेरिकन कंपनी थर्मो फिशर बनवत आहे.
  • ओमीशुअरने घेतलेले नमुने पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा खात्री करण्यासाठी या नमुन्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करता येऊ शकते.