
राज्यात आतापर्यंत उन्हाळी पिकांची 3 लाख 19 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 90 हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. तर सरासरीच्या तुलनेत सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गोंदिया, भंडारा जिह्यांत भात, तर नांदेड, यवतमाळ जिह्यांत भुईमुगाचे क्षेत्र अधिक आहे. अनेक वर्षांनंतर उन्हाळी क्षेत्रात यंदा वाढ झाली.
राज्यात 1 लाख 81 हजार 132 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, दरवर्षी साधारण 2 लाख हेक्टरपर्यंत उन्हाळी पिकांची पेरणी होत असते. गेल्या वर्षी राज्यात 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यात यंदा तब्बल नव्वद हजार हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. यंदा राज्यात 3 लाख 19 हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. गतवर्षी पावसाळ्यात बऱयापैकी पाणी उपलब्ध झाल्यामुळेच यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत भुईमुगाचे क्षेत्र 45 हजाराने, तर भाताचे क्षेत्र पस्तीस हजाराने वाढले आहे. तीळ, सूर्यफुलाचे क्षेत्रही वाढले आहे. सरासरीच्या तुलनेत 176 टक्के पेरणी झाली आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, नांदेड जिह्यांत भात पिकाची, तर कोकण वगळता सर्व जिह्यांत मक्याची पेरणी झाली आहे. उन्हाळी भुईमुगाचे यंदा सर्वाधिक नांदेड जिह्यात क्षेत्र असून, त्या पाठोपाठ नगर, पुणे, सोलापूर, बीड, सातारा, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली जिह्यांत अधिक क्षेत्र आहे. उन्हाळी बाजरीचीही बऱयापैकी पेरणी झाली आहे. अन्य जिह्यांतही यंदा भुईमुगाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. शिवाय परतीचा पाऊसही सलग पंधरा दिवस पडला. त्यामुळे धरण क्षेत्रासह अन्य ठिकाणीही मुबलक पाणीसाठा झाला. त्याचा परिणाम म्हणूनच उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
पीकनिहाय उन्हाळी पीक पेरणी क्षेत्र
(कंसात गतवर्षीचे क्षेत्र हेक्टरमध्ये)
– भात ः 1,07,952 (70,232). z मका ः 44,486 (51,770)
– सूर्यफूल ः 1,357 (557) z भुईमूग ः 1,09,403 (61,078). z तीळ ः 6,524 (2,417). z गळीत धान्य ः 6,000 (2448) z कडधान्य ः 14302 (9846) z तृणधान्य ः 29,072 (32,319).
असे वाढले क्षेत्र
– गोंदिया, भंडाऱयात भाताचे सर्वाधिक क्षेत्र. z नांदेड, यवतमाळ जिह्यांत भुईमूग लागवड वाढली. z गतवर्षीच्या तुलनेत भुईमुगाचे क्षेत्र 45 हजार हेक्टरने वाढले. z भाताचे क्षेत्र 35 हजार हेक्टरने वाढले.
कृषीसाठी साडेसात हजार कोटींच्या कर्जाचे नियोजन
नगर ः नगर जिह्यात यंदा कृषीसह अन्य क्षेत्रात मिळून सुमारे 12 हजार 985 कोटी रुपये कर्जवाटपाचे नियोजन केले आहे. त्यात कृषी क्षेत्रासाठी पीककर्ज व मुदत कर्जवाटपासाठी 7 हजार 831 कोटींचे नियोजन केले असल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वालावलकर यांनी सांगितले. यंदा कृषी क्षेत्राशी निगडित कर्जवाटपासाठी 7 हजार 831 कोटींचे नियोजन केले असून, अन्य बाबींवर 5 हजार कोटींचे कर्ज देण्याचे नियोजनात स्पष्ट केले आहे.
































































