
प्रतिबंधित असलेला सुगंधी पानमसाला विक्री करण्याच्या हेतुने बेकायदेशीरित्या वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी जळकोट रोड उदगीर येथील एकाविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात विठ्ठल सटवाजी लोंढे अन्नसुरक्षा अधिकारी लातूर यांनी तक्रार दिली. दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेख जुनेद हमीद (19) रा. जळकोट रोड उदगीर ता. उदगीर जि. लातूर हा महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचना व नमूद प्रतिबंध अन्नपदार्थ विमल रजनीगंधा पानमसाला व व्ही-1 तंबाखू विक्री करण्याच्या हेतुने बेकायदेशीररित्या त्याचे टोयोटो कारमध्ये वाहतूक करत असताना व स्वतःच्या कब्जात विमल रजनीगंधा पानमसाला व व्ही-1 तंबाखू (किंमत 2,82,360 रुपये) चा माल व कार (किंमत 300000 रुपये असा एकूण 5,82,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याने अन्नसुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून शेख जुनेद हमीद याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































