लातुर शहरात आढळला कोरोनाचा एक रुग्ण

1856

लातूर शहरात आज एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण आज आढळून आलेले असल्यामुळे थोडासा दिलासा आहे. परंतु शहरात पुन्हा रूग्ण वाढल्याने शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक बुदवारी एकुण 144 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.  त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हा शहरातील मोती नगर  येथील रहिवासी असून सद्यस्थितीत या संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

कोव्हिड केअर सेंटर,  लातुर येथुन 8 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल इनक्नक्युजिव्ह आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या