
सामना ऑनलाईन । बोईसर
बोईसर अवधनगर येथील अनधिकृत भंगारच्या गोडाऊनमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला बोईसरमधील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
बोईसर येथील हे भंगार गोडाऊन अनधिकृत असून त्याकडे पोलीस व महसून विभागाचे बिलकूल लक्ष नव्हते. या स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत.





























































