
कृषी कायद्यांविरुद्ध देशभरातील शेतकऱयांचे आंदोलन सुरू असतानाच बुधवारी सिंघू सीमेवर आणखी एका आंदोलक शेतकऱयाने आत्महत्या केली. गुरप्रीत सिंग असे त्याचे नाव असून तो पंजाबच्या फतेहगढ जिह्यातील रुडकी गावचा रहिवासी आहे. सिंघू सीमेवरील कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
45 वर्षीय गुरप्रीत कित्येक महिन्यांपासून सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झाला होता. वर्षभराहून अधिक काळ पृषी कायद्यांना विरोध होऊनही पेंद्र सरकारने शेतकऱयांच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे तो नाराज होता. त्याने पुठलीही ‘सुसाईट नोट’ लिहिलेली नाही. मात्र त्याच्या डाव्या हातावर ‘जिम्मेदार’ शब्द लिहिलेला आहे. बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला, असे भारतीय किसान युनियन एकता सिद्धूपूरचे जिल्हा संयोजक गुरजिंदर सिंग यांनी सांगितले. पुंडली पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी प्रदीप पुमार यांनीही गुरप्रीतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्याच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा उलगडा करण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे भाजपवर टीकास्त्र
पृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱयांच्या भावनांचा उद्रेक होण्याची स्थिती असताना भाजपने ‘ट्रक्टर रॅली’ काढण्याची तयारी सुरू केली आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकwत यांनी जोरदार टीका केली आहे. ट्रक्टर्सबाबत त्यांची प्रचंड तिरस्काराची भावना होती. मग अचानक त्यांचे ट्रक्टर्सवर प्रेम कसे काय झाले? शेती आणि मातीशी त्यांचे इतके प्रेम पुठून आले? असे सवाल टिकwत यांनी केले आहेत.






















































