कारमधून 1 लाख 10 हजार रुपये पळवले

सामना प्रतिनिधी, लातूर

लातूर – अंबाजोगाई रोडवरील एका धाब्यावर पाण्याची बाटली घेण्यासाठी थांबलेल्या कारमधुन 1 लाख 10 हजार रुपये पळवण्यात आल्याची घटना घडली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात श्रीराम निवृत्ती थोरमोटे रा. धनेगाव यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी हे लातूर – अंबाजोगाई रोडवरील धाब्यावर कार थांबवून पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले. बाटली घेऊन परत आले असता कारमधील 1 लाख 10 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी गुडमेवाड करीत आहेत.