नगरमध्ये शुल्लक कारणावरून एकाला मारहाण

341

कडबा भरण्यासाठी आलेला ट्रक का अडवला, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून मच्छिंद्र रंगनाथ माने यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गोरख रंगनाथ माने याच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडबा भरण्यासाठी आलेली ट्रक अडवल्याने मच्छिंद्र माने यांनी गोरख माने यास तू माझ्याकडे कडबा भरण्यासाठी आलेली ट्रक का अडवली अशी विचारणा केली असता गोरख माने याने मच्छिंद्र माने यांच्या डोक्यात दगड मारला. तसेच उजवा हात पिरगाळून खाली पाडले व बायपासचे ऑपरेशन झालेल्या ठिकाणी लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेले माने यांच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुरूंद करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या