आणखी एका मराठा आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामन ऑनलाईन । धुळे

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे यांनी आत्महत्या केलेल्या असतानाच आज धुळ्यातही एका व्यक्तीने आंदोलन सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जितेंद्र जांभळे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. जितेंद्र हा आय़आय़टीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत होता मात्र त्याला अॅडमिशन न मिळाल्याने तो निराश होता.

धुळ्याच्या जिल्हाधिकाऱी कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी आमदारांच्या पुतळ्यांचे दहन करत आंदोलन केले. या आंदोलनात जितेंद्र देखील सहभागी झाले होते. आंदोलन सुरू असतानाच जितेंद्र जिल्हाधिकार्यालयाच्या इमारतीवर चढले व तेथून उडी मारणार होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.