बिहारही हादरले, बलात्कारानंतर तरुणीला गोळ्या घालून पेटविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असताना आता बिहारमधील बक्सरमध्ये अशीच क्रूर घटना समोर आली आहे. हैदराबादप्रमाणे बिहारच्या बक्सर जिह्यात एका मुलीकर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तिच्याकर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्यात आले. या घटनेने हैदराबादप्रमाणे बिहारही हादरले आहे.

बक्सर जिह्यातील इताधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकढा गावातील निर्मनुष्य स्थळावर मंगळवारी सकाळी 6 वाजता एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आल्याचे पोलीस अधीक्षक सतीश कुमार यांनी सांगितले.

अशा आरोपींना कायमचे जेलमध्ये ठेवा 

बलात्कारी नराधमांना कायमचे जेलमध्येच ठेवायला हवे. त्यांना बाहेर येऊच देऊ नये, असे भाजपा खासदार हेमा मालिनी म्हणाल्या. या प्रकरणी वार्ताहारांनी हेमा मालिनी यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

बलात्कारी नराधमांना सहा महिन्यांत फाशी द्या! 

बलात्कारी नराधमांना सहा महिन्यांत फाशी द्या आणि त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कायदा करा, अशी मागणी दिल्ली महिला आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. तसेच आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाली मालीवाल यांनी घेतला आहे.

बलात्कारी नराधमांना जिवंत जाळा! 

क्रौर्याची परिसीमा गाठणाऱया या घटनेबाबत संसदेत गेले दोन दिवस प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय. खासदार जया बच्चन आणि मिमी चक्रावर्ती यांनी नराधमांना चारचौघात ठेचून मारायला हवे, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केल्यानंतर आज शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी बलात्कारी नराधमांना जिवंत जाळायला हवे, असे म्हटले आहे.

मदतीचा प्रत्येक कॉल बॉम्बच्या धमकीसारखा गांभीर्याने घ्या!- बंगळुरू पोलीस आयुक्त 

मदतीसाठी आलेला प्रत्येक कॉल बॉम्बच्या धमकीसारखा गांभीर्याने घ्या, असा आदेश बंगळुरूच्या पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिला आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणानंतर पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी महिलांना आवाहन केले आहे की, त्या कुठल्याही संकटात असतील तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. महिलांनी केलेला कॉल कुठल्याही प्रकारचा असू दे, त्याला सात सेकंदाच्या आत प्रतिसाद देण्याचे सक्त आदेश आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत.