म्हाडा पेपर फुटीप्रकरणी आणखी एकाला अटक; आतापर्यंत 11 जण गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडा परीक्षा पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांची आणखी एका आरोपीला बीडमधून अटक केली. आतापर्यंत याप्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे. कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, पालवन चौक, धानोरा रोड, बीड ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्यात म्हाडाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रीया डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येणार होती. मात्र, तत्पुर्वी परिक्षा घेण्यासाठी कंत्राट दिलेल्या जीए सॉफ्टवेअर कंपनीचे प्रितिश देशमुख याने लॅपटॉपसह पेनड्राईव्हमध्ये पेपर ताब्यात घेतले. आरोपी संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांच्यासह इतरांनी परिक्षेचे पेपर फोडून लाखो रूपयांना विक्री केली. तपासादरम्यान आरोपी कांचन साळवे याचाही सहभाग असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, एसीपी विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, एपीआय कदर देशमुख, उपनिरीक्षक अनिल डफळ, कोंडे, दिवटे, पोतदार, राजपुत, कदम, अनितेक भिंगारे यांनी केली.