जालन्यात म्हाडा कॉलनीत युवकाचा खून; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना शहरातील टि.व्ही. सेंटर परिसरातील म्हाडा कॉलनीत शाहू उर्फ राहुल कचरू उमप (18) याचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिला होता. पोलिसांनी 48 तासात राहुलचा खून करणाऱा आरोपी विनोद उर्फ बंटी देवराव गायकवाड याला अटक केली आहे.

राहुलचा लहान भाऊ विकास उर्फ विकी उमप याचा ४ डिसेंबरला कांचननगरमध्ये लग्न समारंभात वरातीमध्ये नाचण्यावरून शेजारी राहणाऱ्या बंटीशी भांडण झाले होते. त्यात राहुलही पडला होता. त्यावेळी नातेवाईकांनी मध्यस्ती करून वाद सोडविला. वादानंतर बंटीने राहूलला धमकावले होते. गाठ माझ्याशी आहे. तुझा काटाच काढतो. तू मला नडतोस काय, तुला बघु घेईल अशी धमकी बंटीने दिली होती. त्यानंतर तो नेहमी काहीतरी कुरापत्या काढून, भावासोबत भांडत असे. म्हाडा कॉलनीच्या कोपऱ्यावरील चहाच्या टपरीजवळ राहूलचा 18 जानेवारीला बंटीने खून केला. त्याचा मृतदेह कोणाला सापडू नये म्हणून घराजवळील विहीरीत टाकून दिला होता. राहूल बेपत्ता झाल्याची तक्रार करत बंटीने खून केल्याचे राहूलचा भाऊ शिवाजी याने तालुका पोलीस ठाण्याला कळवले होते. त्यानुसार तालुका पोलिसांनी 23 जानेवारीला विहिरीत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाहणी केली असता. तेव्हा राहुलचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी बंटी देवराव गायकवाड याला अटक केली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.