
नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तरप्रदेशमधील लखनौ शहरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद वकिल असे त्या तरुणाचे नाव असल्याचे समजते. त्य़ाच्यावर केजीएयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
After anti-citizenship law protests, one person dies of firearm injury in KGMU Trauma Centre in Lucknow: Official
— Press Trust of India (@PTI_News) December 19, 2019
लखनौमध्ये शुक्रवारी नागरिकता कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांना जमावाला रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी झालेल्या हिंसाचारात 10 वाहने, मीडियाच्या चार गाड्या जाळण्यात आल्या आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
























































