दिल्लीत हिंसाचारादरम्यान एक पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू, दोन पोलीस गंभीर जखमी

909

ईशान्य दिल्लीत CAA विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला असून दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

दिल्लीच्या गोकुलपुरीजवळ भजनपुरा भागात आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात कॉन्स्टेबल रतन लाल गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हिंसाचारात पोलीस आयुक्त वेद प्रकाश शुक्ला आणि अमित शर्मा हे सुध्दा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

हिंसाचारदम्यान आंदोलकनांनी पोलिसांच्या गाड्याही जाळाल्या. सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी इशान्य दिल्लीत 10 ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल आणि गृहमंत्री यांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या