बीड जिल्हय़ात पाणीबळी; पाण्याचा ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीड

जिह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिक मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी संघर्ष करत आहेत. पतीसोबत दुचाकीवरून पाणी घेऊन जाणाऱ्या महिलेचा पाण्याचा ड्रम अंगावर पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिकारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील आडगाव शिवारात घडली.

मीनाक्षी अनुरथ घुगे (26, रा. गुंजाळा, ता. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. गुंजाळा परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणत आहेत. प्रशासनाने टँकर सुरू केले असले, तरी हे पाणी पुरत नाही अशी स्थिती आहे. शनिवारी पहाटे मीनाक्षी घुगे या त्यांचे पती अनुरथ घुगे यांच्यासोबत पाणी आणण्यासाठी दुचाकीकरुन त्यांच्या आडगाव शिवारातील शेतात गेल्या होत्या. तेथे एका ड्रममध्ये पाणी भरून घुगे दाम्पत्य गावी परतत होते. याचदरम्यान धावत्या दुचाकीकरून मीनाक्षी घुगे पाण्याच्या ड्रमसह रस्त्यावर पडल्या.

पाण्याचा ड्रम अंगावर पडल्याने त्यांना गंभीर मार लागला, तर त्यांचे पती अनुरथ घुगे हेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मीनाक्षी घुगे यांना मृत घोषित केले, तर त्यांचे पती अनुरथ यांच्याकर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सोमनाथ घुगे यांच्या खबरीकरून रुग्णालय पोलीस चौकीत घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ क्यक्त होत आहे.