
उरण येथील ओएनजीसीच्या एपीयु युनिटमधुन सकाळी सात वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा वायुगळती झाली आहे. ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला होता. नाल्यात फोमचा वापर करून आग लागणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. सध्या गळती नियंत्रणात आहे. मात्र पुन्हा एकदा वायुगळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून ओएनजीसीच्या अप्पू गेटपासुन समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.
























































