
देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याचे सांगत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात गेल्या काही दिवसांत कांदा 40ते 50 रुपये किलो गेला आहे. आणखी भाववाढ होऊ शकते म्हणून सरकारने निर्यातबंदी घातली. मात्र नवीन कांदा बाजारात येण्यापूर्वी निर्यात बंदी केल्यामुळे याचा फटका शेतकऱयांना बसेल.



























































