कांदा निर्यात बंदी करून मोदी सरकारचा शेतकऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-market

केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेवून राज्यातील व देशातील कांदा उत्पादक शेतकऱयांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

केंद्र सरकारने कांदा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. हा निर्णय बदलण्याच्या संदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन पियूष गोयल यांनी दिले होते. मात्र चार दिवस उलटून गेले परंतु केंद्र सरकारने कोणतीच हालचाल केलेली घेतलेली नाही. त्याचाच परिणाम म्हणून कांदा प्रश्न आज मोठय़ा प्रमाणात पेटलेला दिसत असल्याचे यावेळी महेश तपासे म्हणाले.

संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना सध्या जागतिक स्तरावर कांद्याची मागणी जोर धरू लागली होती. पण त्याच वेळेस केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करुन शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला.