कांद्याचा बाजारभाव स्थिर! सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
onion-5

सामना ऑनलाईन । येवला

सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर ऊन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक २७ हजार ७७० क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० रुपये ते ११६२ रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक १६ हजार ४५५ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० रुपये ते ११९१ रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.

सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर आहे. गव्हाची एकूण आवक ११ क्विंटल झाली असून बाजारभाव १९५२ रुपये इतका आहे. बाजरीच्या आवकेत घट झाली आहे. हरभर्‍याची आवक टिकून असून हरभर्‍याची एकूण आवक २७ क्विंटल झाली आहे. हरभर्‍याचा सरासरी प्रति क्विंटल भाव ३४९५ रुपयांपर्यंत होते.