कोपरगावात कांदा कडाडला; पाच हजारांचा पल्ला गाठला

1493
onion-5

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याने अचानक उचल खाल्ली असून, क्विंटलला तब्बल मागील सात महिन्याच्या कालावधीनंतर अडीच तीन हजाराहून थेट पाच हजार रुपये पर्यंत उसळी घेतली आहे . अवक आवक चांगली असूनही भावही चांगला मिळत आहे   व परराज्यात कांद्याचा हंगाम संपल्याने बाजारभावाने ही उसळी घेतली असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कांद्याच्या दरात  झळाळी आली असून, या आठवड्यात कांद्याने 5 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात चांगलीच वाढ झाली आहे कोपरगाव बाजार समितीत सध्या 6 हजार 340 क्विंटल इतकी आवक होत असून, कांद्या नंबर 1 – 4000 ते 5000,  नंबर 2 – 3600 रुपये ते 3900, गोल्टी कांदा 3000 रुपये ते 3500, खाद 1500 ते 2900 रुपये  प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. कोपरगाव बाजार समितीत किमान 4000 रुपये, कमाल 5000 रुपये, तर सरासरी 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग समाधानी असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली आहे. बाजार समितीत मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे पाच दिवस डाळींब कांदा व भुसार मालाचा लिलाव होत असलेल्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित प्रतवारी करून कांदा आणावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

बाजारात  किरकोळ विक्रीत कांद्याचे दर किलोमागे 40 ते 50 रुपयांवर गेले आहेत. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कांद्याचा दर आणखी वाढून काही दिवसात 70 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थीर आहेत. महिन्यापूर्वी बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक बऱ्यापैकी असल्याने दर कमी होती. शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये ऑॅगस्ट महिन्यात क्विंटलला सरासरी अडीच  हजार , 2 हजार रुपये दर मिळत होता. कांदा उत्पादकांनी साठवून ठेवलेला कांदा संपल्यानंतर आता कांद्याचे दर वाढले आहेत. आता बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला क्विंटलला चार  ते पाच  हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर मध्यमस्वरुपाच्या कांद्याला दोन ते तीन  हजार रुपये क्विंटलला दर मिळत आहे.

बाजार समितीत खुला कांदा विक्री चालू झाल्याने शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत असून  शेतकरी वर्गात समाधान आहे. शेतकर्‍यांनी डाळींब,कांदा व भुसार शेतमाल लिलावासाठी बाजार समितीचे आवारात मंगळवार ते शनिवार  या दिवशी प्रतवारी करुनच विक्रीस आणण्याचे आवाहन सचिव परशराम सिनगर यांनी केले आहे.

कोपरगावात कांदा कडाडला;  पाच  हजारांचा पल्ला गाठला 

मागील आठवड्याच्या तुलनेत कोपरगाव बाजार समिती डाळिंब १८० कॅरेट आवक  असून भावात 8 ते 10 रुपये किलो ची घसरण झाली आहे. प्रतिकिलो 105 रुपये , 20 किलो प्रती कॅरेट डाळिंब नंबर 1 – 1500  ते 2100 रुपये, डाळिंब नंबर 2 -500 ते 1400 रुपये, डाळिंब नंबर 3 -100 ते 450 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या