
ऑनलाईन बँकिंग करणाऱ्य़ा ग्राहकांची संख्या गेल्या दोन वर्षात दुप्पट झाली आहे. तसेच खासगी बँकांमध्ये 72 टक्के व्यवहार हे ऑलनाईन माध्यमातून झाले आहे अशी माहिती केंद्र सरकराने दिले आहे.
2019-20 या वर्षात ऑनलान व्यवहार करणार्या ग्राहकांची संख्या 3 कोटी 40 लाख इतकी होती. ती वाढून 2020-21 मध्ये ही संख्या 7 कोटी 60 लाखपर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
डॉ. कराड म्हणाले. बँकिंगसाठी परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) द्वारे दिला जातो आणि आरबीआयने सूचित केले आहे की ते सध्या डिजिटल बँकांसाठी स्वतंत्र परवाना श्रेणीचा विचार करत नाही.
खासगी बँकांकडून ग्राहकांना ऑनलाईन 43 प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. खासगी बँकांकडून या सेवा सुविधा 8 प्रादेशिक भाशांमध्ये पुरवल्या जातात. गेल्या एक वर्षात डिजिटल लोनच्या माध्यमातून 40 हजार 819 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.






















































