
बेस्ट उपक्रमाने अलिकडेच ऑनलाईन वीज बिले भरणाऱयांसाठी विविध बक्षिसाच्या योजना जाहीर केल्या आहेत. ऑनलाईन वीज बिल भरणाऱया ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात येत असून आता ग्राहकांचा ‘लकी ड्रॉ’ काढत विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्याला फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राईंडर अशी आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.
ऑनलाईन वीज बिल भरणाऱया वीज ग्राहकांना भरघोस बक्षिसे मिळवण्याची संधी उपलब्ध केली असून दर महिन्याला प्रत्येक प्रभागातून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याला फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राईंडर अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध केली आहे. आपल्या 10 लाख वीज ग्राहकांसाठी ही योजना आखली आहे. दरम्यान, 130 वीज भरणा केंद्रांवर ही योजना 10 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. बेस्ट उपक्रमांची 130 वीज भरणा केंद्रे असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 88 शाखांमध्ये व अन्य 44 बँकांमध्ये ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.























































