लातुरात इसमाची ९९,९९७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक

एस.बी.आय कस्टमर केअर सर्व्हिसमधू बोलतोय असे सांगून खात्यामधून परस्पर ९९,९९७ रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना लातूर तालूक्यातील मौजे मुरुड येथे घडली.

या फसवणूक प्रकरणी शंकर उत्तमराव महानवर रा. पारु नगर मुरुड यांनी दिलेल्या तका्ररीत नमूद केले आहे की, त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्याने एस.बी.आय कस्टमर केअर सेंटरमधून बोलतोय असे सांगीतले आणि ई सर्व्हिस अ‍ॅक्टीव्हेट झाली आहे. ती बंद करण्यासाठी ई डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगीतले. त्याचा ओटीपी आल्यानंतर फिर्यादीच्या बॅक खात्यामधून परस्पर ९९,९९७ रुपये काढून घेण्यात आले. मुरुड पोलीसांनी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुध्द दाखल केला आहे. पुढील तपास सायबर सेल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.