अॅप डाउनलोड करण्यास सांगत महिलेला एक लाखांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलमध्ये अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून बँकखात्याची गोपनीय माहिती घेत सायबर चोरट्याने महिलेला 1 लाख 19 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गृहिणी असून कोथरुडमध्ये राहायला आहेत. सायबर चोरट्याने महिलेला फोन करुन विश्वास संपादन केला. त्यानंतर अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारुन ऑनलाईन 1 लाख 19 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी अलंकार पोलीस तपास करीत आहेत.