कॅशबॅकचे प्रलोभन दाखवत तरुणाला एक लाखांचा गंडा

अॅमेझोन कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत कॅशबॅकचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्याने तरुणाला एक लाख सात हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 14 ऑक्टोबरला वानवडी परिसरात घडली. याप्रकरणी रॉबीन प्रमोद चौधरी (वय 33, रा. वानवडी, मूळ- पटणा, बिहार) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉबीन मूळचे बिहारचे असून कामानिमित्त वानवडी परिसरात राहायला आहेत. 14 ऑक्टोबरला सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन अ‍ॅमेझोन कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. रॉबीन यांना विश्वासात घेत 20 टक्के कॅशबॅक आणि अ‍ॅमेझोनचे गिफ्ट देण्याचे आमिष दाखविले. त्याच्यावर विश्वास ठेवत रॉबीन प्रलोभनांना भुलले. सायबर चोरट्याने रॉबीन यांना वेगवेगळ्या बँकखात्यात ऑनलाईन 1 लाख 7 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रॉबीन यांनी तक्रर दाखल केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या