
ऍमेझॉनवरून रोहन दास या नावाच्या व्यक्तीने नवीन लॅपटॉप ऑर्डर केला होता. परंतु कंपनीने आपल्याला जुना लॅपटॉप दिल्याचा दावा करत रोहन दासने एक्सवर ही माहिती शेअर केली. या वेळी त्याने ऍमेझॉनलाही टॅग केले. सोशल मीडियावर ही माहिती शेअर करण्यात आल्यानंतर अनेक युजर्सने कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. ऍनेझॉनने माझ्यासोबत हातचलाखी केली. वापरलेला लॅपटॉप माझ्या हवाली केला. लॅपटॉप नवा आहे. परंतु तो वापरलेला असून या लॅपटॉपची वॉरंटी डिसेंबर 2023पासून सुरू झाली होती, असे रोहन दासने म्हटले. या पोस्टला 2 लाखांहून जास्त लोकांनी पाहिले. 1300हून अधिक लाईक आणि कमेंट केल्या. अमेझॉनच्या अधिकृत हँडलवरूनही कमेंट करण्यात आली असून कंपनीने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
























































