
शिवसेना-युवासेनेच्या वतीने शिवडी विधानसभेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आमदार अजय चौधरी यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही व्याख्यानमाला ऑनलाइन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. www.shivesnaforstunts.com या संकेतस्थळावर तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन करणार आहेत. ज्यात इंग्रजी विषयासाठी भोसले सर, इतिहास या विषयासाठी शैलेंद्र हायस्कूलचे मदन दांगट सर, बीजगणित या विषयासाठी विलास भोसले सर मार्गदर्शन करणार आहे. या ऑनलाइन व्याख्यानमालेसाठी माजी नगरसेवक नंदू विचारे, युवासेना उपसचिव शार्दुल म्हाडगुत यांची विशेष मेहनत घेतली. या व्याख्यानमालेच्या संकेतस्थळाची निर्मिती युवासेना उपसचिव सिद्धेश धाऊसकर यांनी केली आहे. तरी इच्छुकांनी www.shivedesnaforstunts.comed, 9664167587 क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आमदार अजय चौधरी यांनी केली आहे.

























































