प्रकल्पबाधितांसाठी सदनिका वितरणाची ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

प्रकल्पबाधितांना आता आधार क्रमांक व बायोमेट्रिक पडताळणीनंतरच सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. सदनिका वितरणाची ऑनलाईन प्रणाली आजपासून सुरू करण्यात आली. यामुळे पात्र प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन व प्रकल्पांची अंमलबजावणीही अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

बाधित होणाऱ्या पात्र निवासी प्रकल्पबाधितांना पुनर्वसनाच्या दृष्टीने सदनिकांचे वितरण केले जाते. ही वितरण प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासोबतच या प्रक्रियेत पारदर्शकता जपली जावी, यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत मुंबई महापालिकेने एक स्वतंत्र संगणकीय ऑनलाईन प्रणाली कार्यालयीन स्तरावर कार्यान्वित केली.

या प्रणालीमध्ये पात्र प्रकल्पबाधितांची नोंदणीही आधार क्रमांकाधारे केली जाणार आहे. तसेच सदनिका वाटप पत्रावेळी आधार’द्वारे बायोमेट्रिक पडताळणीदेखील केली जाणार आहे. यामुळे पात्र प्रकल्प बाधितांनाच सदनिका मिळेल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी दिली.

summary- online process for housing scheme for rehabilitated