ऑनलाईन सोफा विक्री महागात; सायबर चोरट्याकडून 5 लाखांचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहोपयोगी वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर सोफा विक्रीची जाहिरात देणे तक्ररदाराला महागात पडले आहे. सोफा खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल 5 लाख 6 हजार रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करून फसवणूक केली. याप्रकरणी संबंधिताने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारदार बाणेर रस्ता भागात राहायला असून त्यांनी काही दिवसांपूर्वी जुन्या सोफा विक्रीची ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यानुसार चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधला. सोफा खरेदीचा बहाणा करून व्यवहार 70 हजार रुपयांमध्ये ठरला. त्यानंतर चोरट्याने त्यांना क्युआर कोड पाठवून स्कॅन करण्यास सांगितला. कोड स्कॅन केल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून 5 लाख 6 हजार 600 रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

ऑनलाईन खरेदी -विक्री करताना खबरदारी घ्या
ऑनलाइन खरेदी विक्री करण्याआधी नागरिकांनी संबंधित संकेतस्थळाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच व्यवहार करणे गजरेचे आहे. ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.