फत 15 टक्के प्रवासी मजुरांना अन्नधान्य मिळाले, तीन राज्यातील मजूर वंचित

आत्मनिर्भर पॅकेजदरम्यान केंद्र सरकारने 8 कोटी प्रवासी मजुरांना मोफत रेशन देण्याचा जाहीर केले होते. पण आतापर्यंत फक्त 15 टक्के मजुरांना रेशन देण्यात आले आहे. बुधवारी अन्न मंत्रालयाने आकडेवारी जारी केली आहे. त्यात ही माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि गोव्यात मजुरांना या पॅकेजदरम्यान काहीच लाभ मिळाला नाही असेही या अहवालात समोर आले आहे. तर देशातील 7 राज्यात एक टक्क्यांपेक्षा कमी मजुरांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

मे महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत प्रवासी मजुरांना मोफत अन्न धान्य मिळणार होते. लाभार्थ्यांना शोधण्याची ही जवाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे दिली होती. मे महिन्यात 8 कोटीं मजुरांपैकी 15 टक्के व त्यापेक्षाही कमी मजुरांना म्हणजेच 1.21 कोटी मजुरांना रेशन मिळाले आहे. जूनामध्ये 11.6 टक्के म्हणेच 93 लाख मजुरांना मोफत अन्न मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या