एमबीए सीईटीचा निकाल जाहीर, केवळ 20 विद्यार्थ्यांना दीडशेहून अधिक गुण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत फक्त 20 विद्यार्थ्यांनाच 200 पैकी 150 हून अधिक गुण मिळाले आहेत. तर 126 ते 150 पर्यंत गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 677 इतकी आहे.

एमबीए सीईटीसाठी राज्यभरातून 1 लाख 2 हजार 851 विद्यार्थी बसले होते. या परीक्षेत 100 पर्यंत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली पहिलीची सीईटी परीक्षा सुरळीत पार पडली. एमबीए प्रवेशासाठी राज्यात सुमारे 35 हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या गुणांनुसार प्रवेश दिले जाणार आहेत.

सीईटीचा निकाल
मिळालेले गुण    विद्यार्थी संख्या
151-175            20
126-150          677
101-125      5,013
51-100     48,614
00-50       48,527