
‘एआय’मुळे जगभरातील लाखो नोकऱ्या धोक्यात येतील, असे बोलले जात आहे. मात्र, खरोखर असा परिणाम होईल का, याचा अंदाज आत्ताच लावणे कठीण आहे, मात्र, इतिहासात अशा अनेक भीती खोटय़ा ठरल्या, असे मत ‘ओपनएआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी व्यक्त केले.
नवी दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी झालेले ऑल्टमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले, की एआयचा नोकऱ्यांवर परिणाम होईल की नाही, याचा अंदाज आताच लावणे कठीण आहे. औद्योगिक क्रांतीच्या काळात लोक नोकऱ्या जाणार म्हणून घाबरले होते. मात्र, पुढे ते चुकीचे ठरले. आताही काही लोक वेगवेगळी भाकीतं करत आहेत.
प्रत्येक गोष्टीत पुढे राहणे कठीण
सॅम ऑल्टमन म्हणाले, की रोबोटिक्स, इलेक्ट्रिक मोटार्स तसेच ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत चीन खूप पुढे आहे. काही गोष्टीत आपण देखील त्यांच्या पुढे आहोत. पण, प्रत्येक गोष्टीत पुढे राहणे कठीण आहे, असे ऑल्टमन म्हणाले.


























































