चॅटजीपीटीचा प्लॅन आता फ्री!

ओपनएआयने आपल्या युजर्सला एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने नुकतीच एक घोषणा केली असून यानुसार ओपनएआयचा चॅटजीपीटी गो प्लॅन आता सर्वांना मोफत वापरता येणार आहे. पुढील महिन्यात 4 नोव्हेंबरपासून चॅटजीपीटी गो प्लॅनची सुविधा पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. ही मुदत महिना-दोन महिन्यांसाठी नव्हे, तर तब्बल एक वर्षासाठी असणार आहे. 4 नोव्हेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत युजर्सला ही सुविधा मोफत वापरता येणार आहे.

चॅटजीपीटीच्या वापरासाठी ओपनएआयकडून आतापर्यंत चार प्रकारचे प्लॅन देण्यात आले आहेत. यात चॅटजीपीटी फ्री प्लॅन, चॅटजीपीटी गो प्लॅन, चॅटजीपीटी प्लस प्लॅन, चॅटजीपीटी प्रो प्लॅन आहेत. चॅटजीपीटी फ्री प्लॅनसाठी युजर्सला कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या प्लॅनमध्ये युजरला फाइल अपलोडिंगची मर्यादित मुभा, मर्यादित इमेज तयार करणे, मर्यादित मेमरी आणि मर्यादित डीप सर्चची सुविधा मिळते. चॅटजीपीटी गो प्लॅनसाठी 399 रुपये प्रति महिना शुल्क आकारले जाते, परंतु नव्या घोषणेनुसार ही सुविधा वर्षभरासाठी मोफत करण्यात आली आहे. चॅटजीपीटी प्लस प्लॅनसाठी 1999 रुपये प्रति महिना शुल्क आकारले जाते. चॅटजीपीटी प्रो प्लॅनसाठी 19,900 रुपये प्रति महिना शुल्क आकारले जाते.