Operation Sindoor – पंजाबमध्ये विमान कोसळून एकाचा मृत्यू तर, 9 जण जखमी

पहलगाम हल्ल्याच्या 16 व्या दिवशी हिंदुस्थानने पाकड्यांविरोधात एअर स्ट्राईक केला. हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. हिंदुस्थानने केलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान पंजाबमधील भटिंडा येथील गव्हाच्या शेतात एक विमान कोसळले. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले.

Operation Sindoor – हिंदुस्थानच्या कारवाईत क्रूरकर्मा मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू, ढसाढसा रडला!

मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडातील गोनियाना मंडीतील अकलियां कलां गावात पहाटे 2 वाजता ही घटना घडली. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना एक विमान शेतात कोसळले. त्यानंतर लगेचच त्या विमानाला आग लागली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. गोविंद असे या मृत व्यक्तीचे नाव असून तो हरयाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळले ते ठिकाण लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर आहे.

LIVE अपडेट Operation Sindoor: हिंदुस्थानी सैन्याच्या कारवाईत 70 दहशतवादी ठार

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसर सील केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेचच आग नियंत्रणात प्रयत्न सुरू केले. दरम्यान, कोसळलेल्या विमानाबाबात अद्याप माहिती मिळालेली नाही.