देशातील 27 विमानतळे बंद

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागांमधील सुमारे 27 विमानतळ बंद आहेत. तर गुरूवारी दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द करण्यात आली. यात 5 आंतरराष्ट्रीय फ्लाईट्चा समावेश होता. पहलगाम हल्ल्यानंतर 24 एप्रिलला भारताने पाकिस्तानकरिता आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर 30 एप्रिलला पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. आता भारत-पाकमधील तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांना प्रवेश देणारे सुमारे 25 उड्डाण मार्ग बंद करण्यात आले आहेत. या बंदमुळे भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडल्यानंतर विमान कंपन्यांना पाकिस्तानची हवाई हद्द वगळून, वळसा घालून जावे लागेल.