Operation Sindoor- हिंदुस्थानने केलेल्या आॅपरेशन सिंदूरनंतर जगभरातून येणाऱ्या प्रतिक्रीया

हिंदुस्थानने पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशाने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या या कारवाईवर आता जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी हल्ला झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. भारताने रात्री दीड वाजता हा हल्ला केला आणि पाकिस्तानमधील 9  दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हल्ल्यात अनेकजण जखमीही झाले आहेत.

पाकिस्तानवर केलेल्या या हवाई हल्ल्याबद्दल माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, लोकांना वाटत होते की काहीतरी नक्कीच घडेल, हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही शक्तिशाली देश आहेत आणि कोणीही या दोन अणुशक्तींनी युद्धाकडे वाटचाल करताना पाहू नये. यासोबतच ट्रम्प यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आणि आजच्या जगाला युद्ध नको तर शांतता हवी आहे असे सांगितले.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आम्हाला या घटनेची माहिती असून, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.