
स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A15s हिंदुस्थानात लॉन्च केला आहे. नवीन Oppo A15s स्मार्टफोनचे डिझाइन Oppo A15 सारखेच आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Oppo च्या या लेटेस्ट फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.
किंमत
Oppo A15s फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,490 रुपये आहे. हा फोन डायनॅमिक ब्लॅक, फॅन्सी व्हाइट आणि सिल्वर या तीन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. तुम्ही Amazon वर 21 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले
Oppo A15s स्मार्टफोन कलरओएस 7.2 वर काम करतो. या ओप्पो स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी + डिस्प्ले असून स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89 टक्के आहे.
कॅमेरा
यात फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ डेथ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.




























































