Oppo A16 हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Oppo  ने नुकतंच Oppo A16 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन बजेट फोन असून त्यामध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये हिलिया G 35 प्रोसेसरही देण्यात आला आहे.

मागच्या वर्षी Oppo ने Oppo A15 हा फोन लॉन्च केला होता. Oppo A16 हा त्याचा पुढील व्हर्जन आहे. Oppo A16मध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड  11 आहे. फोनमध्ये  IMG GE8320 GPU, 3 GB LPDDR4x RAM आणि 32 जीबी eMMC 5.1 स्टोरेज देण्यात आले आहे.

फोनमअध्ये 4 GBचा RAM आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असून २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि मोनो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनची किंमत 13 हजार 990 रुपये इतकी आहे. हा फोन क्रिस्टल ब्लॅक आणि पर्ल ब्ल्यु अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. हा फोन तुम्ही ऍमेझॉनवरून विकत घेऊ शकता.