सहा कॅमेरे आणि 6 GB रॅम, Opp F17 हिंदुस्थानात लॉन्च; जाणून घ्या किंमत

Oppo F17 हा मोबाईल हिंदुस्थानात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये 6 कॅमेरे आणि त्याचा रॅम 6 जीबींचा असणार आहे. या फोनचे स्पेसिफिकेशन कळल्यानंतर देशात मोबाईल प्रेमींमध्ये याबाबत मोठी उत्सुकता होती.

आज सात वाजता Oppp F17 हा फोन एका सांगितीक कार्यक्रमात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये तब्बल सहा कॅमेरे आहेत. सेल्फीप्रेमींना समोर ठेवून हा फोन बनवण्यात आला आहे. या फोनला दोन फ्रंट कॅमेरे आहेत. ते कॅमेरे 16  मेगा पिक्सल इतके आहेत. तर मेन कॅमेरा हे 48 मेगापिक्सल इतके आहेत.

या फोनमध्ये 6 ते 8 gb चा रॅम असण्याची शक्यता आहे. तर 12 जीबी इंटर्नल स्टोरेज आणि 128 एक्सटर्नल स्टोरेज असणार आहे. या फोनचा प्रोसेसर MediaTak Helio P95 असणार आहे. तर बॅटरी 4 हजार mAh इतकी असणार आहे. तसेच हा फोन फुल HD असणार आहे. त्यामुळे चित्रपट आणि वेबसीरीजसाठी अगदी परफेक्ट फोन आहे.  या फोनची किंमत २५ हजार इतकी आहे. लवकरच हा फोन ऍमेझॉन  आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

आपली प्रतिक्रिया द्या