
Samsung पाठोपाठ आता ओप्पोनेही आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N लॉन्च केला आहे. कंपनीने आपल्या Oppo Inno Day निमित्ताने हा फोन लॉन्च केला आहे. या फोनला फोल्ड करून ग्राहक डिस्प्लेच्या साहाय्याने मोबाइलचा वापर करू शकतात. तसेच हा स्मार्टफोन अनफोल्ड केल्यानंतर 7.1 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे.
Oppo Find N ची डिझाइन Samsung च्या Galaxy Z Fold शी मिळतीजुळती आहे. यात पण तुम्हाला दोन स्क्रीन पाहायला मिळते. प्रायमरी स्क्रीन आणि कव्हर डिस्प्ले. असं असलं तरी Galaxy Z Fold हा Oppo Find N पेक्षा आकाराने थोडा मोठा आहे. कंपनीने आपल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये सॅमसंगच्याच डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. मात्र ओप्पोने डिस्प्ले पॅनलला आपल्या पद्धतीने कस्टमाईझ केलं आहे. हा मोबाइल 2 लाख वेळा फोल्ड-अनफोल्ड केला जाऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. तत्पूर्वी सॅमसंगनेही आपला Galaxy Z Fold स्मार्टफोन लॉन्च करताना हाच दावा केला होता.
Oppo Find N मध्ये कव्हर डिस्प्ले 5.49 इंचाचा दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. यामध्ये कंपनीने Qualcomm Snapdragon 888 चिपसेट दिला आहे. याच्या टॉप मॉडेलमध्ये 12GB RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसे यात 16 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईल्ड सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे आणि 13-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
Oppo Find N मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W च्या फास्ट चार्जरला सपोर्ट करते. तसेच हा फोन 15W वायरलेस चार्जिंगलाही सपोर्ट करतो. कंपनीने याच्या पॉवर बॅटमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. सध्या कंपनीने हा फोन चीनमध्येच लॉन्च केला असून याची विक्रीही चीनमध्येच सुरू आहे. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 7,699 युआन (सुमारे 91 हजार रुपये) आहे. चीनमध्ये याच्या टॉप मॉडेलची किंमत 8,999 युआन (सुमारे 1 लाख 7 हजार रुपये) आहे.

























































