मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील संधी

सामना प्रतिनिधी । मुंबई 

मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी फारशी अडचण येत नाही. विद्यापीठाद्वारेच ठरवले जाते की, त्यांची कशाच्या आधारावर निवड केली जाऊ शकते. अभियांत्रिकी क्षेत्रातील मेकॅनिकल इंजिनीयर ही सर्वात जुनी आणि मोठी शाखा. यामध्ये पॉवर प्लांट इंजिनीयरिंग, एचव्हीएसी, मट्रोलॉजी आणि क्वालिटी कंट्रोल, प्रोडक्शन इंजिनीयरिंग, मेंटेनन्स इंजिनीयरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीयरिंग अशा विविध विभागांचा सहभाग असतो. बीटेकचा अभ्यास मेकॅनिकल इंजियिरिंग या विष़यात केला असेल तर नोकरीच्या अनेक संधी या करीयरमध्ये उपलब्ध होऊ शकतात. यामध्ये असा ठरावीकच विभाग असू शकतो, ज्यामध्ये मशीन किंवा उपकरणांचा वापर करता येणार नाही.

कामाचे स्वरूप
बऱ्याचशा वस्तू ज्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो, त्या मेकॅनिकल इंजिनीयरकडून विकसित केल्या जातात. अशा वस्तूंचे डिझाइनही तेच करतात. उदा. संगणक, ऑटोमोबाईल्स, स्पोर्ट्स इक्विपमेंटस्, मायक्रो सेन्सर्स, रोबोट्स याशिवाय अनेक वस्तू. ज्या आपले आयुष्य अधिकाधिक सुखावह होण्यासाठी मदत करतात.

महाविद्यालये

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुवाहाटी
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी.                                                                                                                                                                                                                        शैक्षणिक पात्रता
  • 12वीनंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये करीयर करू शकतो. याकरिता त्याला बी.टेक. साठी प्रवेश घ्यावा लागतो. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेलॉजीमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असल्यास जॉइन्ट एन्ट्रन्स परीक्षा पास होणे आवश्यक आहे. बी.टेक. नंतर 2 वर्षांचे एम. टेक. ही करता येते.
  • 10वीनंतरही मेकॅनिकल इंजिनियर होण्याची संधी आहे. यासाठी पॉलिटेक विषयात प्रवेश घ्यावा. यामध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा करता येऊ शकतो. पदवी प्राप्त झाल्यानंतर चांगल्या पदावरील नोकरी मिळू शकते.
  • मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये डॉक्टरेट वा पीएचडी (डॉक्टर ऑफ़ फिलॉसॉफी डिग्री) प्राप्त करण्यासाठी 3 वर्षांचा अवधी असतो.

आपली प्रतिक्रिया द्या