
काही तांत्रिक कारणांमुळे केंद्रीय पात्रता परीक्षा पेपर 1 (सीटीईटी) देता न आलेल्या उमेदवारांना पुन्हा परीक्षेची संधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) उपलब्ध करून दिली आहे. 16 डिसेंबर 2021 रोजी सीटीईटी पेपर 1 घेण्यात आला होता, मात्र ऐनवेळी तांत्रिक समस्या उद्भवल्याने उमेदवारांना परीक्षा पूर्ण करता आली नव्हती. अशा उमेदवारांची पेपर 1 ची परीक्षा 17 जानेवारी रोजी होणार आहे.
उमेदवारांसाठी सुधारित प्रवेशपत्र सीबीएसईने जारी केले असून उमेदवार ती सीटीईटीच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात. मूू.हग्म्.ग्ह या वेबसाईटवर सुधारित प्रवेशपत्र उपलब्ध आहेत. 17 जानेवारी रोजी पेपर 1 ची परीक्षा दुपार सत्रात होणार असून दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा देण्याचे शहर, परीक्षा केंद्र यात कोणताही बदल करण्याची विनंती करता येणार नाही, असेही सीबीएसई बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.






















































