राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेदरम्यान भाजपचा गोंधळ, सभात्याग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपालांच्या अभिभाषणाकरील चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणादरम्यान संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याचे निमित्त करत भाजप सदस्यांनी गोंधळ घातला. उपसभापती नीलम गोऱहे यांनी भाजप सदस्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप सदस्यांनी सभात्याग केला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिकेशनाच्या आज दुसऱया दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणाकरील चर्चा दुपारी अडीच वाजता सुरू झाली. त्याकेळी शिवसेनेच्या मनीषा कायंदे, काँग्रेसचे भाई जगताप यांची राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषणे झाली. कोरोना काळात सरकारने केलेल्या कामकाजाची दखल राज्यपालांनी अभिभाषणात घेतल्याचे या सदस्यांनी नमूद केले. त्यानंतर साडेचार काजता किरोधी पक्षनेते प्रकीण दरेकर यांनी भाषणाला सुरुवात केली.

त्यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या भाषणातील काही मुद्दे हे समान आहेत. विधानसभेत आज सकाळी केलेल्या भाषणासारखेच हे मुद्दे आहेत, असे विधान संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी केले. मात्र, त्यांच्या या विधानाचे निमित्त करत हा विरोधी पक्ष नेत्याचा अपमान आहे. आम्ही काय बोलायचे हे कोणी ठरवू शकत नाही. माफी मागा नाही तर सभात्याग करू, असे दरेकर यांनी सांगितले.

मात्र, विरोधी पक्ष नेत्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी दोन्ही सभागृहात उपस्थित असल्यामुळे मला तसे वाटले, असे स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिले. मात्र, त्यानंतरही भाजप सदस्यांचा गोंधळ सुरू राहिला. झालेला प्रकार हा निव्वळ गैरसमजुतीमधून झालेला आहे. भाजप सदस्यांनी गोंधळ घालू नये, सभात्याग करू नये, असे आवाहन उपसभापती नीलम गोऱहे यांनी केले. मात्र, भाजप सदस्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी करत सभात्याग केला.