Monsoon Session – विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, अजित पवारांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली. तसेच यामागील कारणे देखील त्यांनी स्पष्ट केली.