देशात अघोषित आणीबाणी! नितीशकुमार यांचा घणाघात!! विरोधक एकत्र लढल्यास 2024 मध्ये भाजपला 50 जागांवर रोखू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न होत आहे. समाजासमाजात फूट पाडून जातीय तेढ निर्माण केली जात आहे.

केंद्रातील भाजप सरकारने देशात अघोषित आणीबाणी लागू केली आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर सुरू असून, समाजासमाजामध्ये जातीय तेढ वाढविला जात आहे, असा घणाघात जदयूचे अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी आपले मतभेद बाजूला सारून एकत्र आल्यास भाजपला 50 जागा मिळतील, असे भाकीतच नितीशकुमार यांनी स्पष्टपणे सांगितले.

जदयूच्या दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पाटणा येथे सुरू झाली. यावेळी नितीशकुमार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देश कठीण काळातून जात आहे. लोकशाहीचे मूल्य आणि संविधानातील तरतुदींचे उल्लंघन सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. महागाई, बेरोजगारी, गरिबी वाढत आहे आणि हे लोक विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहात आहेत, अशा शब्दांत नितीशकुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र्ा सोडले.

आमदारांची फोडाफोडी संविधानिक आहे का?

मणिपूरमध्ये जदयुचे सहा आमदार आहेत. त्यांतील पाच आमदार भाजपने नुकतेच पह्डले. त्यावर नितीशकुमार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘‘बिहारमध्ये जदयूने ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचे जाहीर केले, तेव्हा मणिपूरमधील जदयुचे सहा आमदार येऊन मला भेटले आणि आनंद व्यक्त केला. त्यानंतर या आमदारांना पह्डण्यात आले. ही फोडाफोडी संविधानिक आहे का? इतर पक्षांचे आमदार फोडणे योग्य आहे का?  यापूर्वी असे घडले आहे का?’’ असे सवाल नितीशकुमार यांनी केले. ‘‘देशभरात अशीच फोडाफोडी सुरू आहे. मात्र, 2024च्या निवडणुकीत देशातील जनताच भाजपचा ‘निक्काल’ लावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नितीशकुमार उद्यापासून दिल्ली दौऱयावर

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सोमवारपासून (दि. 5) दोन दिवसांच्या दिल्ली दौऱयावर असणार आहेत. 2024च्या निवडणुकीत विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या दृष्टीने ते विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या संपका&त नितीशकुमार आहेत. ‘आप’चे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचीही भेट घेऊन ते चर्चा करण्याची शक्यता आहे.

विरोधकांची एकजूट हेच आपले ध्येय

विरोधी पक्षांची एकजूट हेच आपले ध्येय असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकारकडून अघोषित आणीबाणी देशात सुरू आहे. केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न होत आहे. समाजासमाजात फूट पाडून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी आपले मतभेद गाडून एकजूट दाखविली तर भाजपला देशभरात केवळ 50 जागा मिळतील, असे भाकीतच त्यांनी वर्तविले.