ओरॅकल कंपनी नव्या सीएफओंना देणार 215 कोटी वार्षिक पगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओरॅकल कंपनीने एकाच वेळी जगभरातून 30 हजार आणि एकट्या हिंदुस्थानातून 12 हजार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले होते. आता त्याच कंपनीने नव्या मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) हिलरी मॅक्सन यांना तब्बल 215 कोटी रुपये वार्षिक पगार देण्याची घोषणा केली आहे. मॅक्सन यांना बेसिक पगार 7.8 कोटी, 26 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 215 ते 246 कोटी रुपये मूल्यांचे शेअर्स, परफॉर्मन्स बोनस 20 ते 23 कोटी, 2 कोटी रुपयांपर्यंतचे इतर फायदे असे एकूण 215 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक पगार मिळणार आहे.