सलग दुसऱ्या वर्षी ऑस्कर निवेदकाशिवाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 92 वा ऍकॅडमी ऍवॉर्ड्स सलग दुसऱयावर्षी निवेदकाशिवाय सादर होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नऊ वेळा या ऍवॉर्ड शोचे निवेदन करणाऱया बिली क्रिस्टलने सांगितले,‘निवेदकाशिवाय कार्यक्रम लवकर पूर्ण होईल. मात्र यामुळे कार्यक्रमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नाही. 71 वर्षीय क्रिस्टल अमेरिकन अभिनेते, कीओ आर्टिस्ट, कॉमेडियन आहेत. नुकतेच जिमी किमैल यांच्या लाईव्ह शोमध्ये पोहोचलेल्या बिली पुढे म्हणाले निवेदकाशिवाय कार्यक्रम सादर करणे म्हणजे साक्षीदारांशिवाय सुनावणी घेणे. आतापर्यंत 9 वेळा मी ऑस्करचे निवेदन केले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी असून त्याठिकाणी उभे राहणे हे मला नक्कीच आवडेल.